खिडकीतून उडी मारून अल्पवयीन मुलीने संपवली जीवनयात्रा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
अल्पवयीन मुलीने राहत्या घराच्या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताडदेव येथील इम्पिरियल टॉवरमध्ये  शुक्रवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या दरम्यान घडली .
 प्रियंका आमरिष कोठारी (वय १६) या अल्पवयीन मुलीने राहत्या घराच्या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. इम्पिरियल टॉवरमध्ये रूम नं. २३०८ मध्ये कोठारी कुटुंबीय राहतात. काल मध्यरात्री प्रियंकाने याच रूमच्या खिडकीतून खाली उडी मारून जीवन संपवलं. यामागे नेमकं काय कारण याचा ताडदेव पोलीस तपास करत आहेत. मुलीला नायर रुग्णालय येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी दाखल पूर्व मृत घोषित केले.    Print


News - Rajy | Posted : 2018-10-27


Related Photos