अहेरी तालुक्यात बनावट जातीचे दाखले तयार करुण देणारी टोळी सक्रिय : दोन युवकांवर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
अहेरी उपविभागात सध्या उपविभागीय अधिकारी यांचे नावे बनावट शिक्के तयार करुण बनावट महसूल दस्ताऐवज तयार केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली व त्यांची चौकशी सुरू असतानाच पुन्हा एक नवीन प्रकरण समोर आले आहे. तालुक्यात बनावट जातीचे प्रमाणपत्र तयार करुन देणारी टोळी सक्रिय असून दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे . 
 सविस्तर वृत असे की, कोडेसेपल्ली येथील तलाठी व्ही.एस.कावटी यांचेकडे साज्यातील दोन युवक मारोती डुब्बा कोरेत व राकेश भीमराव सीडाम हे  उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी आले असता कावठी यांनी दाखला कशाकरीता आवश्यक आहे. असे विचारले असता आम्हाला आलापल्ली येथून ६०० रुपये प्रती प्रमाने जातीचे प्रमाणपत्र मीळाले. आता केवळ उत्पन्नाचे प्रमाणापत्राचीच गरज आहे ते आम्हाला प्रकल्प कार्यालयात योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. तलाठी कावटी यांनी जातीच्या प्रमाणपत्राची अधीक चौकशी केली असता सदर जातीचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे निदर्शनास आले. तहसील कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयातून सदर तारखेला कोणतेही जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. जातीचे प्रमाणपत्र हे शंभर टक्के बनावट असल्याची खात्री झाल्यानंतर तलाठी कावटी यांनी उपविभागीय अधिकारी अहेरी व नायब तहसीलदार दिनकर खोत यांचे निदर्शनास आनून दिले.
या प्रकरणाची जलद गतीने चौकशी होण्याच्या  दृष्टीने उपविभागीय अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेशान्वये नायब तहसीलदार दिनकर खोत यांनी पोलिस स्टेशन अहेरी येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अधीक तपास केला असता आलापल्ली येथील महाऑनलाईन सेतू केंद्र चालक दिक्षा सखाराम झाडे यांचेकडून बनावट जातीचे प्रमाणपत्र वितरीत केल्याचे आढळून आले. तसेच आलापल्ली येथीलच सचीन डोंगरे यांच्या मालकीचे प्राणहिता इनफोटेक सव्हिसेस या दुकानातील संगणक परिचालक दिवाकर आनंद मडावी यांनी आपल्या बयानात जातीचे बनावट प्रमाणापत्र तयार केल्याचे सांगितले. सचिन डोंगरे व दिवाकर मडावी या दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करुन कोर्टात उभे केले असता अहेरी कोर्टानी या दोन्ही आरोपीना २८ ऑक्टोबर  पर्यंत चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हजारे करीत आहेत. 
याबाबत उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अहेरी डाॅ.इंदुराणी जाखड यांना विचारणा केली असता ,"बनावट जातीचे प्रमाणपत्र काही सेतू केंद्रातून तयार करुन दिल्या जात आहे. हे खरे आहे. अशा प्रकारचे फार मोठे राॅकेट असु शकते. म्हणून आपण पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. तपासात अनेक बाबी निष्पन्न होतील तसेच बनावट काम करनारी सक्रिय टोळी लवकरच पकडल्या जाईल." असे मत त्यांनी व्यक्त केले . 
   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-27


Related Photos