आजचे दिनविशेष
महत्वाच्या घटना (१७ जानेवारी )
१७ जानेवारी १७७३ : कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
१७ जानेवारी १९१२ : रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.
१७ जानेवारी १९४५ : दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
१७ जानेवारी १९४६ : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
१७ जानेवारी १९५६ : बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.
१७ जानेवारी २००१ : अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
१७ जानेवारी २००१ : कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
१७ जानेवारी १९४१ : नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनी ला प्रयाण
जन्म (१७ जानेवारी )
१७ जानेवारी १७०६ : लेखक आणि संशोधक बेंजामीन फ्रँकलिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १७९०)
१७ जानेवारी १८९५ : लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७८)
१७ जानेवारी १९०५ : भारतीय गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म.
१७ जानेवारी १९०६ : भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २०००)
१७ जानेवारी १९०८ : चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९९४)
१७ जानेवारी १९१७ : अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)
१७ जानेवारी १९१८ : टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे २०१४)
१७ जानेवारी १९१८ : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ ’माल अमरोही यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)
१७ जानेवारी १९३२ : साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९३)
१७ जानेवारी १९४२ : अमेरिकन मुष्टियोद्धा मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले यांचा जन्म.
मृत्यू (१७ जानेवारी )
१७ जानेवारी १५५६ : दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १५०८)
१७ जानेवारी १७७१ : पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन यांचे निधन.
१७ जानेवारी १८९३ : अमेरिकेचे १९वे राष्ट्राध्यक्ष रदरफोर्ड बी. हेस. यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १८२२)
१७ जानेवारी १८९५ : मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे निधन.
१७ जानेवारी १९३० : गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचे निधन. (जन्म: २६ जून १८७३)
१७ जानेवारी १९६१ : काँगोचे पहिले पंतप्रधानपॅट्रिक लुमूंबा यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९२५)
१७ जानेवारी १९७१ : स्वातंत्रसैनिक, घटनातज्ज्ञ बॅ. नाथ बापू पै यांचे ह्रुदयविकाराने निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२२)
१७ जानेवारी १९८८ : अभिनेत्री लीला मिश्रा यांचे निधन.
१७ जानेवारी १९९५ : ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांचे निधन.
१७ जानेवारी २००० : गायक आणि अभिनेते सुरेश हळदणकर यांचे निधन.
१७ जानेवारी २००५ : चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन.
१७ जानेवारी २००८: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स तथा बॉबी फिशर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९४३)
१७ जानेवारी २०१० : प. बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१४)
१७ जानेवारी २०१३ : मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्ना देवधर यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)
१७ जानेवारी २०१४ : बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९३१ – पाबना, पाबना, बांगला देश)
News - todayspecialdays