कर्त्यव्यावर कसूर करणाऱ्या कोरची तालुक्यातील ग्रामसेवक व तलाठी यांना जिल्हाधिकाऱ्यांचे कारणे दाखवा नोटीस


- लग्न समारंभात २५ पेक्षा अधिकांची उपस्थिती असतांनाही कोणतीही कारवाई न करणे पडले महाग 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची :
तालुक्यातील बेलगाव / सोनपूर येथे लग्न कार्यात २५ पेक्षा अधिकांची उपस्थिती असल्याने सदर गावातील ग्रामसेवक व तलाठी यांनी कर्तव्यावर असतांनाही आयोजीत लग्न समारंभात कोणतीही कारवाई न केल्याने तहसिलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
संपुर्ण राज्यात कोविड १९ साथरोग प्रादुर्भाव रोखण्याकरिता संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या काळात लग्न समारंभात जास्तीत जास्त २५ लोकांना उपस्थित राहण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. असे असतांना १५ मार्च रोजी कोरची तालुक्यातील बेलगांव /सोनपूर येथे आयोजीत लग्न समारंभात जवळजवळ दीड हजार लोकांची उपस्थिती होती. दरम्यान सदर गावातील ग्रामसेवक व तलाठी यांनी कर्तव्यावर असूनही आायोजीत लग्न समारंभातील लोकांवर कोणहीही कारावाई केली नाही. याबाबत कोरची येथील तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हा प्रशासनाने ग्रामसेवक व तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कर्तव्यावार असलेल्या ठिकाणी पार पडलेल्या लग्न समारंभात मोठया प्रमाणात गर्दी झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन झालेले असून आदेशाचे काटेकोर पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, कर्तव्यात गंभीर कसूर केलेला असून शिस्तभंगाच्या कारावाईस पात्र असून शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये ? अशी कारणे दाखवा नोटीस बेलगांव / सोनपूर येथील ग्रामसेवक व तलाठी यांच्याविरूध्द बजावण्यात आली आहे. याबाबतचे स्वयंस्पष्ट लेखी स्पष्टीकरणे हे नोटीस प्राप्त झाल्यापासून २४ तासाच्या आत सादर करावे अन्यथा आपणास काहीच म्हणावयाचे नाही असे गृहीत धरून प्रस्तावित केल्याप्रमाणे एकतर्फी कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-04-17


Related Photos