मोबाइल फोनमधून सोन्याची तस्करी करणाऱ्याकडून विमानतळावर ८७ लाख ५० हजारांचं सोनं हस्तगत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ झोकण्यासाठी सोन्याची तस्करी करणाऱ्याकडून जे मार्ग अवलंबले जातात ते पाहून थक्क व्हायला होते. सर्वसामान्य माणूस कल्पनाही करु शकणार नाही अशा पद्धतीने ही तस्करी चालते. असाच थक्क करणारा प्रकार गुरुवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला असून सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मोबाइल फोनमधून सोन्याची तस्करी करणाऱ्याकडून ८७ लाख ५० हजारांचं सोनं हस्तगत केला आहे .   
 बाबूलाल सोलंकी असे आरोपीचे नाव असून त्याने मोबाइलच्या मागच्या भागात सोन्याची बिस्कीटे लपवली होती. सीमा शुल्क अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आल्यानंतर तपासणीसाठी सुरु केली. त्यावेळी  त्याच्या बॅगमध्ये एकूण तीन मोबाइल फोन आढळले . या तिन्ही मोबाइलमध्ये  ८७ लाख ५० हजार किमतीची  तीन किलो सोन्याची बिस्किटे होती.    Print


News - Rajy | Posted : 2018-10-26


Related Photos