वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पोलीस निरीक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोल्हापूर :
वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पोलीस निरीक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर या अधिकाऱ्याने वारणा नदीत उडी मारली. या घटनेने कोल्हापूर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रदीप काळे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी व्हॉट्सॲपवर मजकूर पोस्ट केला. वरिष्ठांकडून होणारा छळ सहन होत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद केले. त्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर वारणा नदीत उडी घेतली. काळे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने कोल्हापूर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, फेब्रुवारीत नवी मुंबईत एपीएमसी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनीही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. डिसेंबर २०२०मध्ये अशाच प्रकारची एक घटना तुळींज पोलीस ठाण्यात घडली होती. तेथील कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.
  Print


News - Rajy | Posted : 2021-04-14


Related Photos