अखेर दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली : नवे वेळापत्रक होणार जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर झाल्याने अखेर राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. 'सध्याची परिस्थिती परीक्षा घेण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे तुमचे आरोग्य हे आमचे प्राधान्य असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात येत आहे', अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची आज दहावी आणि बारावी परीक्षेच्या संदर्भात बैठक झाली. या बैठकीत सध्या नियोजित वेळापत्रक बदल करावा असा सूर लावण्यात आला. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारकडून आगामी काळात अधिकृतरित्या परीक्षेचे  नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-04-12


Related Photos