चंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्ह्यात दारूबंदी घोषित झाल्यापासून अवैध दारू तस्करी आणि विक्री करणारांवर चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रभावी कारवाही करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. यादरम्यान २४ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत नाकेबंदी आणि छापे टाकून ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. 
यामध्ये जिल्ह्यातील पोलीस स्टेशन बल्लारशाह, घुघुस, दुर्गापूर, भद्रावती, माजरी, तळोधी, राजुरा, कोरपना, गडचांदूर अंतर्गत संबंधित पोलीस पथकाने प्रभावी कार्यवाही करीत दारू तस्करी आणि विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहे. सदर कार्यवाहीमध्ये जिल्ह्यात १६ गुन्ह्याची नोंद करून  २ वाहन आणि ९ आरोपीसह एकूण २० लाख ३७ हजार ४०० रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील पुढील तपास संबंधित पोलीस स्टेशन करीत आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-26


Related Photos