४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल नष्ट : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारूच्या हातभट्टीवर धाड टाकुण दारूसह ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. सदर करवाई काल ९ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आली. विकास अदित्यनाथ घरामी, गिरीश माखनलाल विश्वास, सुग्रीव गौर विश्वास सर्व रा. शांतीग्राम ता. मुरचेरा जि.गडचिरोली असे आरोपींची नावे असून आरोपी फरार आहे.
जिल्हयातील अवैध दारूविक्री तसेच बेकायदेशिर दारू वाहतुकीस आळा बसावा याकरिता ठिकठिकाणी सापळे रचुन दारूविक्रेत्याविरूध्द कारवाई करणे सुरू असून बेकायदेशिररीत्या हातभट्टी दारू गाळणाऱ्या इसमांच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, काल ९ एप्रिल २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध दारू विक्री विरोधात पोस्टे अहेरी परिसरात गस्त करीत असतांना शांतीग्राम येथील वरील नमुद आरोपी हे ठोक दारू विक्रेते टिकेपल्ली गावाजवळील नदीकिनाऱ्यावर परिसरात हातभट्टी लावून अवैध गुळाची दारू काढत आहेत अशा गुप्त माहितीवरून अपर पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखली सापळा रचुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पंचाना सोबत घेवून सदर परिसरात अवैध दारूचा शोध घेत असता तीन इसम संशयीरीत्या हालचाल करतांना व काहीतरी लपवितांना आढळून आले. तसेच पोलीसांना पाहून पळ काढला. पोलीस पथकांनी त्यांचा पाठलाग केला असता ते तिनही इसम हाती आले नाही. सोबतच्या पंचांनी सदर इसमांना ओळखुन आरोपींची नाव सांगितले व घटनास्थळाची पाहणी केली असता दारू गाळण्याकरिता वापरण्यात आलेल्या साहित्यांसह  ४ लाख ५० हजारांचा मोहसडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. सदर तिनही आरोपीविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सदर कारवाई गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि विक्रांत सगणे व पथकाने केली असून अवैध दारूची विक्री करणाऱ्या इसमांविरूध्द कारवाई करणाऱ्या पथकाचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी कौतूक केले व अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यवसायीकांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-04-10


Related Photos