महत्वाच्या बातम्या

 तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत चार हजाराहून अधिक रुग्णांनी घेतला महाआरोग्य शिबिराचा लाभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सध्याच्या धावपळीच्या युगात अन्न उत्पादन प्रक्रियेत रासायनिक खते, द्रव्यांच्या अधिक वापर तसेच बदललेल्या जीवनशैलीमुळे मोठ्या प्रमाणात याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन विविध प्रकारच्या आजाराने नागरिकांना ग्रासले आहे. समाजातील गोरगरीब जनतेच्या आर्थिक अडचणी जाणून घेत गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य सेवेचा वारसा पुढे नेत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी येथे आयोजित ब्रह्मपुरी महोत्सवा दरम्यान सलग दोन दिवशीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये एकूण चार हजार हून अधिक रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळाला असून तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
ब्रह्मपुरी महोत्सव निमित्ताने राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून आयोजित दोन दिवसीय महाआरोग्य शिबिरास प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत महात्मे रुग्णालय नागपूर येथील नेत्ररोग तज्ञ डॉक्टरांकडून १२५३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३०९ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तर यावेळी २५०० रूग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालय नागपूर अंतर्गत अत्याधुनिक कॅन्सर डिटेक्टिव्ह व्हॅन या अत्याधुनिक यंत्राद्वारे सुसज्ज कर्करोग निदान वाहनांमध्ये एकूण ३९६ महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुखाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, मामोग्राफी द्वारे तपासणी करण्यात आली. ११२ रुग्ण हर्निया व २७ हायड्रोसिल रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
तसेच इतर हजारो रुग्णांच्या आरोग्य तपासणी दरम्यान रक्त तपासणी, थुंकी तपासणी व इतर तपासण्या करून सर्वांना मोफत औषधी वितरण, हजारो रुग्णांची मोफत भोजन व्यवस्था करण्यात आले. आयोजित बातमी रुग्णालय नागपूर मेडिकल कॉलेज चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी तसेच ब्रह्मपुरी येथील ब्रह्मपुरी महोत्सव आरोग्य समितीचे डॉ. सतीश कावळे डॉ. वंजारी, डॉ. गेडाम, ॲड. गोविंद भेंडारकर तसेच ब्रह्मपुरी महोत्सव समिती, काँग्रेस कमिटी, नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos