महत्वाच्या बातम्या

 दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला : आयएसआयसाठी काम करणाऱ्या दोघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : २६ जानेवारी पूर्वी दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी येथून दोन दहशतवाद्यांना अटक केले होते. हे दोघे आयएसआय साठी काम करत असल्याचे समोर आले. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उघडकीस आणला आहे. जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांची चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हरकत उल अन्सार आणि खलिस्तान टायगर फोर्स यांचे संबंध असल्याचे उघडकीस आले. हे दोन्ही दहशतवादी गट पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय च्या आश्रयाखाली तयार करण्यात आले आहेत, ज्याचा उद्देश भारतात दहशत पसरवणे, असेही दिल्ली पोलिसांच्य स्पेशल सेलने सांगितले आहे.

जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी भालस्व डेअरीवर छापेमारी केले आणि दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केले. दोघांनी दिलेल्या माहितीवरून भालसवा नाल्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. नाल्यामध्ये एका मृतदेहाचे तीन अवशेष आढळून आले आहेत. या दोन्ही संशयितांनीच हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos