पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास सोसायटी 'सील'


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
एका सोसायटीमध्ये पाचपेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आढळल्यास सोसायटी मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित केली जाणार आहे. याकालावधीत सोसायटीमध्ये बाहेरील व्यक्‍तींना येण्यास मनाई असणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
सोसायट्यांमध्ये सुद्धा करोना बाधितांची संख्या मोठी आहे. यापार्श्‍वभूमीवर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपाययोजना करण्यात येत आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर झाल्यानंतर सर्व नियमांचे सोसायटीने काटेकोरपणे पालन करावे, तसेच त्याबाबत देखरेख ठेवावी.
सोसायटीमध्ये बाहेरील व्यक्‍तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध असल्याचे फलक लावणे आवश्‍यक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास सोसायटीवर 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
तसेच सोसायटीमध्ये नियमित येणाऱ्या कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्‍यक असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-04-08


Related Photos