महत्वाच्या बातम्या

 वडसा ब्रम्हपुरी बायपास रस्ता तत्काळ सुरू करा


- समाजवादी पार्टी जिल्हा सचिव फैजान पटेल यांची नगर पालिकेकडे निवेदनातून मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंज शहरातून ब्रम्हपुरी रोड कडे जाणाऱ्या बायपास रस्त्याची अत्यंत भयानक दुर्दशा झाली होती. सदर बायपास रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी समाजवादी पक्षाने रेठुन धरली होती. नगर पालिका देसाईगंजनें दखल घेत सदर रस्त्याचे बांधकाम सुरू केले. परंतू सदर रस्त्यावरील जड वाहतूक ही देसाईगंज येथील कमलानगर येथून वळवळविण्यात आले. परंतू जड वाहतुकीच्या आवागमनाणे कमला नगर येथील रस्ते पूर्ण तहां फुटले रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत़. दररोज याच रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत़. सदर कमला नगर येथुन सुरू असलेली जड वाहतूक बंद करावी आणि सदर अर्धवट बनून तयार झालेला वडसा ब्रम्हपुरी बायपास रस्ता तत्काळ सुरू करावा अशी मागणी आज समाजवादी पार्टी गडचिरोली जिल्हा सचिव फैजान पटेल यांच्या नैत्रूत्वात निवेदनातून देसाईगंज नगर पालिका मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्या कडे करण्यात आली आहे. सदर निवेदन देतांना अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष खलील खान आणि देसाईगंज येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos