महत्वाच्या बातम्या

 राम सागर तलावातील पाणी शुध्दीकरण व गाळ उपसा करा : न.प.चे बांधकाम सभापती सागर मने यांची मुख्याधिकारी यांचेकडे मागणी


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : शहराच्या मध्यभागी असलेला राम सागर तलावामध्ये संपुर्ण नाल्यातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी नाल्याद्वारे राम सागर तलावात जात असल्यामुळे तलावातील पाणी दूषित झालेले आहे. परिसरामध्ये दुर्गंधी पसरत असून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
त्यामुळे राम सागर तलावातील पाणी शुद्धीकरण करून गाळ उपसा करण्यात यावा. अशी मागणी आरमोरी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती यांनी न.प.चे मुख्याधिकारी माधुरी सलामे यांचेकडे निवेदनाद्वारे केली.
मने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राम सागर तलावाच्या सौदर्यीकरण व पाणी शुध्दीकरणाकरीता बऱ्याच वर्षापासुन नागरीकांची मागणी होत आहे. तलावातील दुषीत पाणी झाले असल्यामुळे तलावातील पाणी बाहेर सोडून तलावातील गाळ उपसा करण्याबाबत नागरीकांची मागणी आहे. यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळे दरवर्षी पेक्षा जास्त प्रमाणात पाणी दुषीत झालेला आहे. राम सागर तलावाच्या सभोवती नागरीकांची वस्ती, मार्केट लाईन, राम मंदिर, दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, सती मातामाय मंदिर तसेच हेमांडपथी मंदिर असल्यामुळे दैनंदिन कामाकरीता तसेच मंदिरामध्ये नागरीकांची मोठया प्रमाणात वर्दळ सुरू असते. आरमोरी तालुक्याचे ठिकाण असल्याने मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरीक येत असल्याने आरमोरीची अस्वछ प्रतिमा पसरत आहे. तलाव सौदर्यीकरणाकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे. राम सागर तलावाला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. परंतु तलावातील दुषीत पाण्यामुळे दुर्गधी पसरत असून नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम पडत असल्यामुळे तलावातील पाणी शुध्दीकरण करणे तसेच तलावातील गाळ उपसा करण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावे, अशीही मागणी सागर मने यांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना सुद्दा लेखी कळविण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos