महत्वाच्या बातम्या

 कटलेल्या पतंगाचा पाठलाग करणाऱ्या मुलाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सध्या संक्रातमुळे उपराजधानीत पतंगबाजीला जोर आला आहे. अनेक जण घराच्या छतावरून तर काही खुल्या मैदानातून पतंग उडविण्याचा आनंद घेत आहेत. परंतु, १३ वर्षीय मुलगा कटलेल्या पतंगाच्या मागे गेल्याने त्याला धावत्या रेल्वेची जोरदार धडक बसली. यात मुलाचा जागीच जीव गेला. कटलेल्या पतंगाच्या नादी लागून उपराजधीतील या वर्षातील पहिला बळी गेला आहे. ध्रूव ऊर्फ वंश प्रवीण धुर्वे (रा. कुंभार टोळी वस्ती, धंतोली) असे मृत मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीतील कुंभारटोळीतून जाणाऱ्या नागपूर-मुंबई रेल्वे लाईनवर काही मुले पतंग उडवित होते. शुक्रवारी दुपारी वंशसुद्धा तेथे पतंग उडवित होता.  एक कटलेली पतंग खाली येताना बघून  वंशसुद्धा पळायला लागला.  रेल्वे येत असल्याचे वंशच्या लक्षात आले नाही.  पतंग लुटण्याच्या नादात वंशला रेल्वेची जबर धडक बसली. वंशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos