महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना 

१४ जानेवारी १७६१ : मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.

१४ जानेवारी १९२३ : विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.

१४ जानेवारी १९९४ : मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.

१४ जानेवारी १९९८ : ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.

१४ जानेवारी २००० : ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

जन्म

१४  जानेवारी १८८२ : संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणावर काम करणारे कृतीशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म. (मृत्यू : १४ ऑक्टोबर १९५३)

१४ जानेवारी १८८३ : जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचा जन्म. (मृत्यू : ३० नोव्हेंबर १९७०)

१४  जानेवारी१८९२ : भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म. (मृत्यू : २४ ऑगस्ट १९९३)

१४ जानेवारी १८९६ : भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा जन्म. (मृत्यू : २ ऑक्टोबर १९८२)

१४ जानेवारी १९०५ : मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म. (मृत्यू : २२ सप्टेंबर १९९१)

१४  जानेवारी १००८ : ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.

१४  जानेवारी १९१९ : गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचा जन्म. (मृत्यू : १० मे २००२)

१४  जानेवारी १९२३ : अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू : २५ ऑक्टोबर २००९)

१४ जानेवारी १९२६ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म.

१४  जानेवारी १९३१ : ऊर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचा जन्म. (मृत्यू : २५ ऑगस्ट २००८)

१४ जानेवारी १९७७ : भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन यांचा जन्म.

मृत्यू 

१४  जानेवारी १७४२ : धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचे निधन. (जन्म : ८ नोव्हेंबर १६५६)

१४ जानेवारी १७६१ : पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन. (जन्म : ४ ऑगस्ट १७३०)

१४ जानेवारी १७६१ : पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचे निधन. (जन्म : २ मार्च १७४२)

१४  जानेवारी१८९८ : इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन.

१४  जानेवारी१९२० : डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन. (जन्म : २५ ऑक्टोबर १८६४)

१४  जानेवारी १९९१ : संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचे निधन. (जन्म : १६ नोव्हेंबर १९१७)

१४  जानेवारी २००१ : माहितीपट निर्माते फली बिलिमोरिया यांचे निधन.






  Print






News - todayspecialdays




Related Photos