कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला रात्री ८.३० वाजता संबोधित करणार मुख्यमंत्री


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेला समाजमाध्यमांच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. यामध्ये संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्याच्या ऐवजी काही प्रमाणात निर्बंध कठोर करण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे कोरोना चाचण्याचं प्रमाण वाढवणे, तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेणे, लसीकरण वाढवणे असे काही प्रमुख अजेंडे हाती घेऊन त्यावर राज्य सरकार  अधिक काम करण्याचा निर्णय घेईल, अशी माहिती आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज नेमकी काय भूमिका जाहीर करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-04-02


Related Photos