महत्वाच्या बातम्या

 अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून द्या


- भारतीय मजदूर संघ जिल्हा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांचे आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन

- कामगारांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व कामगार मंडळाच्या अधिकाऱ्यांची फोनवरून केली चर्चा

- कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आमदारांचे निवेदकांना आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामधील बाह्यस्त्रोत सफाई कामगारांचे प्रलंबित वेतन, वायुनंदना पावर प्लांट कनेरी येथील सुरक्षा रक्षकांना कामगार मंडळाचे नोकरीचे नियम व तरतुदी लागू करणे, गडचिरोली जिल्हा रुग्णालय तथा ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांचे वेतन नियमित मिळावे, बंद पडलेल्या जेजाणी पल्स अँड पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेड देसाईगंज वडसा येथे कार्यरत असलेल्या ७५ कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे यासारख्या समस्याग्रस्त कामगारांना आपण न्याय मिळवून द्यावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदनाच्या माध्यमातून केली.

यावेळी निवेदकांनी लक्षात आणून दिलेल्या समस्या संदर्भात आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी व कामगार मंडळाच्या संबंधित अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावे अशी सूचना केली.

कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार डॉ. देवराव  होळी यांनी निवेदकांना दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos