लोकेशन मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अर्धा तास मारत होते चकरा


वृत्तसंस्था / कोल्हापूर :  मुख्यंमत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर भरकटण्याच्या घटना घडतच असून लोकेशन मिळत नसल्याने मुख्यत्र्यांचे  हेलिकॉप्टर पुन्हा एकदा भरकटले. हे हेलिकॉप्टर अर्धा तास कोल्हापूर शहरावर मारत होते. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीहून कोडोलीकडे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर  भरकटले. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा पोहोचले. 
मुख्यमंत्री दिवसभर सांगलीत होते. बैठक संपल्यानंतर सव्वा चार वाजता ते कवलापूर मैदानातून हेलिकॉप्टरने कोडोलीकडे निघाले. यावेळी त्यांच्यासमवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. लोकेशन मिळत नसल्याने हेलिकॉप्टर अर्धा तास कोल्हापूर शहरावर चकरा मारत होते. शेवटी जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी कोडोलीची दिशा दाखवल्यानंतर ते वारणा येथील हेलिपॅडवर उतरवण्यात आले. यामुळे कार्यक्रमास पोहोचण्यास मुख्यमंत्र्यांना उशीर झाला.  याआधी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि लातूर मध्ये मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते.   Print


News - Rajy | Posted : 2018-10-25


Related Photos