महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र येथे सिलेज संकल्पनेवर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे सिलेज संकल्पनेचे गडचिरोली संदर्भात अमंलबजावणी करण्याच्या उद्देशाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान, सल्लागार व कार्यालय प्रमुख, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, नागपूर, महाराष्ट्र शासन प्रगती गोखले व कार्यशाळेचे मुख्य वक्ता म्हणून सिलेज संकल्पनेचे प्रणेते अजित पाटणकर, ज्येष्ठ सल्लागार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई, महाराष्ट्र शासन आदी उपस्थित होते.

कार्यशाळेदरम्यान कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी समाजाच्या समृद्धी आणि स्वयंपूर्ण विकासासाठी सिलेज संकल्पना राबविणे महत्त्वाचे असल्याचे  मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेचे मुख्य वक्ता अजित पाटणकर, ज्येष्ठ सल्लागार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई, महाराष्ट्र शासन यांनी आपल्या व्याख्यानादरम्यान सिलेज संकल्पनेमागचे उद्दिष्ट काय आहे, या संकल्पनेची सुरुवात कशी झाली, ग्रामीण क्षेत्रातील तंत्रज्ञान-सक्षम शाश्वत विकासासाठी एकात्मिक ज्ञान-आधारित परिसंस्था तयार करणे कश्याप्रकारे महत्वाचे आहे ते पटवून दिले व या संकल्पनेची अमंलबजावणी गडचिरोलीमध्ये कश्याप्रकारे करता येईल याकरिता मार्गदर्शन केले. सिलेज म्हणजे  एकात्मिक शाश्वत ग्राम विकास मॉडेल, ज्याचे उद्दिष्ट आहे, नवीन आणि योग्य ज्ञान-आधारित तंत्रज्ञानाचा लाभ घेणे, खेड्यांमध्ये उच्च-स्तरीय उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, ज्यामध्ये कृषी व्यतिरिक्त उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील संबंधित क्रियाकलापांचा समावेश आहे.

 सदस्य सचिव, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई, महाराष्ट्र शासन प्रा. नरेंद्र शहा तसेच इतर मान्यवर दुरद्श्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos