महत्वाच्या बातम्या

 रस्ता सुरक्षा पायदळ रॅलीचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते शुभारंभ


- रस्ता सुरक्षा अभियान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / वर्धा : शासनाच्या वतीने 11 ते 17 जानेवारी या कालावधीत राज्यात रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महात्मा गांधी चौक येथून हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर, याकुब व सर्व मोटार वाहन निरिक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक उपस्थित होते. पायदळ रॅलीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था व विविध शाळेचे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी रॅलीतील उपस्थित विद्यार्थ्यांनी अपघात टाळण्यासाठी पादचा-यांनी रस्त्याच्या उजव्या बाजुने चालावे, असा संदेश नागरिकांना दिला. रॅली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करुन आर्वी नाका येथे रॅलीचा समारोप करण्यात आला, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos