१ एप्रिल २०२० मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  १ एप्रिलपासून भारतात भारत स्टेज-४ म्हणजेच BS-4 या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.   वाहनांमधून होणारे प्रदूषण हे पर्यावरणाला हानिकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या वाहनांना पर्याय म्हणून १ एप्रिल २०२० नंतर भारत BS-6 प्रकारच्या इंजिनाचा वापर करावा लागणार आहे. एप्रिल २०१७ मध्ये BS-4 वाहनांची विक्री अनिवार्य करण्यात आली होती.  आताच्या BS-4 वाहनांची विक्री बंद झाल्यानंतर कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ही वाढ एक ते दिड लाखांपर्यंत होईल असे बोलले जात आहे.
BS-6 मुळे कार बनविण्याच्या खर्चात वाढ होणार आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात भारतात दिल्लीमध्ये BS-6 सुविधेच्या कारमध्ये इंधन भरण्याची सुविधा पहिल्यांदा दिल्लीत उपलब्ध झाली. मात्र या नव्या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्याला मोठा हातभार लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपन्यांनी आता आपल्याकडे असलेला BS-4 चा स्टॉक लवकर क्लिअर करावा असे कंपन्यांना सांगण्यात आले आहे. जे ग्राहक आधीपासून BS-4 किंवा BS-3 च्या कार वापरतात त्यांना कोणत्या अडचणी येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.  Print


News - World | Posted : 2018-10-25


Related Photos