महत्वाच्या बातम्या

 महिलांच्या सुरक्षेसाठी १८१ क्रमांकाची स्वतंत्र हेल्पलाइन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : संकटग्रस्त, पीडित महिलांना तातडीची मदत उपलब्ध व्हावी यासाठी 181 या क्रमांकाची स्वतंत्र हेल्पलाइन राज्य शासनाने सुरू केली आहे. ही हेल्पलाइन टोल फ्री असून त्याद्वारे केवळ संरक्षणासाठीच नव्हे तर महिलांच्या सबलीकरणासाठीही फायदेशीर ठरणार आहे.

181 ही हेल्पलाइन 2014 पासून अस्तित्वात होती, परंतु ती मुख्यमंत्र्यांच्या 18001208040 या हेल्पलाइनमध्ये विलीन करण्यात आल्याने त्यावर येणारे कॉल हे या क्रमांकावर जात होते. महिलांशी संबंधित कॉल असले तर त्यासाठी आवश्यक प्रशिक्षित कर्मचारी तिथे उपलब्ध नसल्याने संबंधित महिलेला वेळेवर मदत मिळत नव्हती. तसेच महिलांसंबंधित कॉल्सची आकडेवारी वेळोवेळी सादर करावी लागत असल्याने ती मिळत नव्हती. त्यामुळे 181 ही हेल्पलाइन मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनमधून वेगळी करण्यात आली आहे. आता ही स्वतंत्र हेल्पलाइन चोवीस तास सुरू राहणार आहे.

डायल केल्यास ही मदत मिळणार

- पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका

- शासकीय योजना, सुविधांबद्दल माहिती

- हुंडा व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांशी थेट संपर्क

- समुपदेशन, कायदेशीर मदत





  Print






News - Rajy




Related Photos