पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या कार्यकाळात जिल्ह्याला सर्वाधिक निधी


- कोट्यवधींची विकासकामे प्रगतीपथावर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात ना. आत्राम यांच्या कार्यकाळात जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाला आहे. यामुळे कोट्यवधी रूपयांची विकासकामे प्रगतीपथावर आहेत.
जिल्हा मागास व अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम हे मंत्रीमंडळातील सर्वात तरूण मंत्री आहेत. उच्च विद्याविभुषीत असलेले ना. आत्राम हे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने तसेच स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अनुकूल असल्याचे सिध्द झाले आहे. मागील चार वर्षाच्या कार्यकाळात कोट्यवधींचा निधी खेचून आणला. जिल्ह्यातील नगरपंचायती, नगर परिषदांच्या विकासासाठी तब्बल ५०  कोटींचा निधी मंजूर करून घेतला. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी पाठपुरावा केला. निधीअभावी रखडलेले सिंचन प्रकल्प सुरू करण्यासाठी निधी मिळवून दिला. डिपीडीसी च्या निधीतही वाढ करून घेतली. यामुळे अनेक योजना राबविण्यास मदत मिळाली.   
 ना आत्राम यांच्या कार्यकाळात अहेरी विधानसभा क्षेत्रात विकासकामांना गती मिळण्यास वाव मिळाला. ना. आत्राम यांनी जिल्ह्यातील तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा मिळवून दिला. यामुळे नगर पंचायतींच्या विकासनिधीमध्ये वाढ होवून शहरांच्या विकासाला चालना मिळाली. नगर पंचायतींच्या हद्दीत स्वच्छता, हायमास्ट लाईट, पक्के रस्ते आदींसाठी कोट्यवधींचा निधी मिळाला. 
गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालय सुरु करण्यासाठी पाठपुरावा ,  अहेरी उपविभागातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या महिला व बाल रूग्णालय अहेरी येथे उभारण्यासाठी मंजूरी मिळवून घेतली. यासाठी शासनाकडून ५८ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणून एकलव्य विद्यालयासाठी २२ कोटी रूपयांचा निधी खेचून आणला. दरवर्षी पावसाळ्यात अनेक दिवस मार्ग बंद करणाऱ्या  गडअहेरी नाल्यावर पुलाच्या बांधकामासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची पावसाळ्याच्या दिवसातील समस्या दूर होणार आहे. आलापल्ली - नागेपल्ली येथील पाणीपुरवठा योजनेसाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करवून घेतला.  आलापल्ली आणि सिरोंचा येथे सर्व सोयी - सुविधायुक्त बसस्थानकांच्या निर्मितीसाठी प्रत्येकी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. तसेच अहेरी आणि सिरोंचा नगर पंचायतींना ८५ लाख रूपये किमतीची अग्नीशमन वाहने उपलब्ध करून दिले. 
अहेरी येथील नगर पंचायतीच्या इमारत बांधकामासाठी नुकत्याच झालेल्या अधिवेशनादरम्यान ५ कोटी रूपयांच्या निधीस मंजूरी मिळवून घेतली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून १५० ते २०० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला असून गडचिरोली जिल्ह्यात अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. आलापल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामांसाठी ७ कोटी, सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी ४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. या कामाचा शुभारंभ सुध्दा करण्यात आला आहे. तसेच पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पाठपुराव्यामुळे आलापल्ली येथील ६६ केव्ही विद्युत उपकेंद्राचे १३२ केव्ही उपकेंद्रामध्ये रूपांतरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-24


Related Photos