महत्वाच्या बातम्या

 १४ जानेवारीला नागपूर  येथे ‘व्यवसाय करणे सुलभ’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्यातील उद्योग सुलभता व व्यवसाय वाढीस अनुकुल वातावरणास चालना मिळण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून १४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कै. आबासाहेब खेडकर सभागृह, जिल्हा परिषद, सिव्हील लाईन, नागपूर येथे उद्योग संचालनालय, मुंबई व मैत्री कक्षामार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचा उद्देश व्यावसायीक व उद्योजक यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्याचा आहे. आय.टी. पातळीवर आणि नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध सुधारणाविषयी व शासनाने राबविलेल्या विविध सुधारणा विषयी वापर कर्त्याकडून अभिप्राय घेण्यासाठी व्यवसाय करणे सुलभ सुधारणा बदल सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आयोजित करुन उद्योजकांचे शंका-समाधान करण्यात येईल.
या कार्यशाळेसाठी नागपूर जिल्हयातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, नामांकित उद्योजक, भावी उद्योजक, सनदी लेखापाल, वास्तु रचनाकार, उद्योग व्यवसायाची संबधीत असणारे शासकीय विभागाचे अधिकारी तथा सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहे. तेव्हा या कार्यशाळेकरीता वर उल्लेख केलेल्या प्रतिनिधीनी आपल्या उद्योजक सहकारी सोबत सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहून कार्यशाळा यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक एस.एस. मुद्यमवार यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos