महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (१३ जानेवारी)

१३ जानेवारी १६१० : गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.

१३ जानेवारी १८८९ : नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

१३ जानेवारी १९१५ : इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.

१३ जानेवारी १९३० : मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.

१३ जानेवारी १९५३ : मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.

१३ जानेवारी १९५७ : हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.

१३ जानेवारी १९६४ : कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.

१३ जानेवारी १९६७ : पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.

१३ जानेवारी १९९६ : पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेसहि रेल्वेगाडी सुरु झाली.

१३ जानेवारी २००७ : के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म (१३ जानेवारी)

१३ जानेवारी १९१९ : आंध्रप्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)

१३ जानेवारी १०२६ : हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते शक्ती सामंत यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००९)

१३ जानेवारी १९३८ : प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म.

१३ जानेवारी १९४८ : जोधपूरचे राजा गज सिंघ यांचा जन्म.

१३ जानेवारी १९४९ : भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म.

१३ जानेवारी १९८२ : पाकिस्तानी क्रिकेटपटू कमरान अकमल यांचा जन्म.

१३ जानेवारी १९८३ : भारतीय चित्रपट अभिनेता इम्रान खान यांचा जन्म.

मृत्यू (१३ जानेवारी)

१३ जानेवारी १८३२ : लॉर्डस या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)

१३ जानेवारी १९७६ : सुप्रसिद्ध तबलावादक अहमद जाँ. थिरकवा यांचे निधन.

१३ जानेवारी १९८५ : हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मदन पुरी यांचे निधन.

१३ जानेवारी १९९७ : उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)

१३ जानेवारी १९९८ : संगीत दिगदर्शक आणि नृत्य दिगदर्शक शंभू सेन यांचे निधन.

१३ जानेवारी २००१ : संस्कृत पंडित आणि लेखक श्रीधर गणेश दाढे यांचे निधन.

१३ जानेवारी २०११ : ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १९३१)

१३ जानेवारी २०१३ : क्रिकेटपटू रुसी सुरती यांचे निधन. (जन्म: २५ मे १९३६)





  Print






News - todayspecialdays




Related Photos