महत्वाच्या बातम्या

 औद्योगिक संघटनांनी एकत्रित येऊन निर्यातवाढीसाठी प्रयत्न करावे : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : निर्यात वाढविण्याकरीता जिल्ह्यातील सर्व औद्योगीक संघटनांना, स्थापित उद्योग, कृषि उत्पादने आणि कृषि उत्पादक निर्यातक घटकांनी एकत्रित येऊन निर्यात वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या बैठकित ते बोलत होते.

यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जी. बी. तईकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी रा. ल. गजभिये, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अर्चना कडू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता प्रशांत महाजन, भंडारा राईस क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन हरडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.एम. शिवणकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विक्रेते आणि निर्यातकांची ओळख करून त्यांची यादी तयार करावी. तसेच शेतकऱ्याशी संपर्क साधुन ‍जिल्ह्यातील पारंपरिक उत्पादनांच्या बाबतीत माहीती घेऊन जी.आय.टॅग उपलब्ध करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या. जिल्हयात कुशल कारागीर आणि उद्योजक निर्मिती व्हावी या अनुषंगाने औद्योगीक संघटनांच्या मदतीने आवश्यक प्रशिक्षण प्रणाली तयार करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.





  Print






News - Bhandara




Related Photos