बागडी ट्रॅव्हल्स मधून ९९ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त : तीन आरोपींना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
नागपूर वरून चंद्रपूर कडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्स मध्ये दारू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पथकास मिळाली . त्यावरून वरोरा येथे ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता ट्रॅव्हल्स मध्ये ९९ हजार रुपयाची विदेशी दारू आढळून आली. याप्रकरणी तिघांना अटक करीत ट्रॅव्हल्स व दारू जप्त करण्यात आली. 
नागपूर वरून चंद्रपूर कडे जाणारी बागडी ट्रॅव्हल्स एमएच ४० ए टी ९९९९ या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सची वरोरा येथील रत्नमाला चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने तपासणी केली असता टूलबॉक्स मध्ये ९९ हजार रुपयाची विदेशी दारू आढळून आली. वरोरा पोलीस स्टेशन मध्ये ट्रॅव्हल्स लावण्यात आल्यानंतर प्रवाशांना परत पाठविण्यात आले. याप्रकरणी दीपक शामराव कामतवार  (३८) , शेख ताज गौस शेख ( ३३), शशिकांत घनश्याम उराडे (२८) रा. सर्व चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकार प्रताप पवार यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाने केली. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-23


Related Photos