महत्वाच्या बातम्या

 पेंच व्याघ्रप्रकल्पात वाघाचा संशयास्पद मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात गुरुवारी वाघाचा संशयास्पद मृत्यू उघडकीस आला. प्रथमदर्शनी तो वाघच असल्याचा विश्वास वनखात्याला असला तरीही शरीर पूर्णपणे सडलेले असल्याने त्याची खात्री करुन घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पवनी बफर क्षेत्रातील सिल्लारी बीटमधील कक्ष क्र. २५६ च्या संरक्षित जंगलातील कोडू तलावात वाघाचा मृतदेह आढळून आला.

गावकऱ्यांनी ही माहिती वनखात्याला दिली. हे ठिकाण पूर्व पेंच्या कक्ष क्र. ५६८ला लागून आहे. वाघाचे शरीर पूर्णपणे सडलेले असून शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी केले जाणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाच्या मानक कार्यपद्धतीनुसार राज्य व्याघ्र संरक्षण दलाची चमू आणि डॉग स्क्वॉड चमू परिसरात शोध घेत आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रसंचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शूक्ल यांच्या नेतृत्त्वाखाली सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर, वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी तपास सुरू केला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos