महत्वाच्या बातम्या

 सिंचनाच्या सुविधेसाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे : भाई रामदास जराते


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्याचा वापर सिंचनाकरीता होवून येथील शेतकरी संपन्न होवू शकतो. त्यासाठी संघर्ष करण्याची गरज असून शेतकऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

तालुक्यातील मौजा काटली येथील अग्नीकुंड या नाटकाचे उद्घाटन भाई रामदास जराते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी काटली ग्रामपंचायतचे सरपंच अरविंद उंदिरवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, कैलास शर्मा, शेकापचे कार्यकर्ते देवेंद्र भोयर, उपसरपंच पार्वता खेडेकर, नवयुवक नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष टिकाराम धारणे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी भाई रामदास जराते म्हणाले की, जिल्ह्यात मेडीगट्टा, चिचडोह, कोटगल बॅरेज बांधल्या गेले. पण याबाबत कोणतेही नियोजन केले गेले नाही. त्यामुळे या धरणांचा सामान्य शेतकऱ्यांच्या शेतीसाठी कोणताही उपयोग होत नाही. उलट हजारो हेक्टर जमीनीला धोका निर्माण झाला आहे. याला जिल्ह्यातील प्रस्थापित लोकप्रतिनिधी आणि राजकारणी जबाबदार आहेत, असा आरोपही भाई रामदास जराते यांनी  केला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos