चितळ शिकार प्रकरणी शिवणी, हिरापूर येथील १७ जणांना अटक


- गडचिरोली वनविभागाची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / गडचिरोली :
चितळाची शिकार करून घरात मांस शिजवत असताना शिवणी व हिरापूर येथील १७ जणांना वनपरीक्षेत्र अधिकारी गडचिरोली यांच्या पथकाने काल २२ आॅक्टोबर रोजी अटक केली आहे. 
मनोहर उष्टूजी भोयर, गजानन लक्ष्मण चुधरी, बाजीराव मसाजी कांबळे, जगन्नाथ मसाजी कांबळे, कार्तिक पुरूषोत्तम गेडाम, संतोष मोरेश्वर मेश्राम, आनंद वामन मानकर, धनराज एकनाथ गेडाम, येमाजी एकनाथ गेडाम, रूषी हना भोयर, अमित राजेंद्र लाटलवार, जीवन दादाजी गेडाम, विनोद गणपत भोयर, योगाजी महादेव गेडाम सर्व रा. शिवणी व पुरूषोत्तम तुकाराम भोयर, सुरेश पत्रुजी गेडाम , हिरामण तडकुजी गेडाम रा. हिरापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शिवणी व हिरापूर येथील आरोपींनी जाळे लावून जंगलात एका नर चितळाची शिकार केली. त्याचे मांस गावात आणले असल्याची माहिती वनविभागास मिळाली. मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. आय. यटबाॅन, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, दक्षता विभागीय वन अधिकारी बिलोलीकर ,  सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, मानद वन्यजीवरक्षक मिलींद उमरे यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी डी.व्ही. कैलुके यांच्या नेतृत्वात वनकर्मचाऱ्यांनी आरोपींना अटक केली. आरोपींककडून शिकारीचे जाळे, लोखंडी भाला, कुऱ्हाड , विळा, लाकडी खुट्या, चितळाचे कच्चे मांस, शिजविलेले मांस, वापरलेली भांडी आदी साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईकरीता क्षेत्रसहाय्यक हेमके, जेनेकर, काळे, साखरकर, वनपाल कुंभारे, वनरक्षक मट्टामी, बोरकुटे, कोडापे, कोडापे, चव्हाण, राठोड, ठाकरे, बोढे, कवडो, भसारकर, टोंगे, दुधबळे, डिकोंडावार, शिंदे, डिगे तसेच वनमजूर आदींनी सहकार्य केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-23


Related Photos