महत्वाच्या बातम्या

 बुलढाणा येथे बांबू नव उद्योगाची निर्मिती होणार


- बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी १४ कोटींचा निधी

- बांबू शेतीतील प्रयोगांचा प्रसार होणे गरजेचे

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / बुलडाणा : महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन व अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी बुलडाणा यांच्या संयुक्त उपक्रमातून जिल्ह्यात लवकरच बांबू उद्योग विकासाचे नवीन पर्व सुरू करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. गिरिराज यांनी बुलडाणा अर्बनच्या मुख्यालयाला भेट दिले. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान दोघांनी विदर्भ व मराठवाड्यात बांबू उद्योगाचा विकास कसा करता येईल तसेच, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू शेती कशी करावी, कोणते रोपे वापरावे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, पाश्चात्त्य देशांमध्ये बांबू हे प्लॅस्टिकला कसे पर्याय ठरू शकते व त्या देशांमध्ये बांबूचा पेरा किती वाढला आहे, या बाबत काही लघु चित्रफीत देखील दाखवण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्यात बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंबाबतही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात बांबूपासून वस्तू तयार करणाऱ्या बुरूड समाज व सुतारी काम करणाऱ्या वर्गाला सोबत घेत बांबूपासून वस्तू तयार करण्याचे चार महिन्यांचे प्रशिक्षण चंद्रपूर किंवा त्रिपुरा (नॉर्थईस्ट) येथे देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

बुलडाणा अर्बन व महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन जिल्ह्यात बांबू उद्योग उभारण्यासाठी बांबू लागवड करणे व शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यास प्रवृत्त करण्यासाठी संयुक्तपणे काम करणार असून या बाबत लवकरच बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचेही चांडक यांनी यावेळी सांगितले.






  Print






News - Rajy




Related Photos