महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्हयात नायलॉन मांजा खरेदी व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई


- एक लक्ष, पंच्यानव हजार, तीनशे पसतीस रुपयाची मालमत्ता जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत प्रतिबंधीत नायलॉन मांजा खरेदी व विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आले आहे.

आगामी मकर सक्रांत सणा निमित्त पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर होवु नये तसेच नायलॉन मांजा मुळे मानवी व प्राणी जिवीतास निर्माण होणारा धोका लक्षात घेता पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी जिल्हयातील सर्व ठाणेदार तथा स्थानिक गुन्हे शाखेला प्रतिबंधीत नायलॉन मांजा खरेदी व विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हयात विशेष मोहीम राबवुन मांजा विक्रीचे दुकान तपासुन लपून-छपुन प्रतिबंधीत नायलॉन मांजा खरेदी व विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर, रामनगर, वरोरा, घुग्घुस, दुर्गापूर, मुल, शेगांव हद्दीत संबंधीत पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथकाने कारवाई करुन आजपावेतो एकुण १२ कैसेस करण्यात येवुन एकुण १ लाख ९५ हजार ३३५ रुपयाची मालमत्ता हस्तगत करण्यात आले असुन सदर मांजा कारवाईची मोहीम यापुढेही संपुर्ण चंद्रपूर जिल्हयात नियमित सुरु राहणार आहे.

तरी जिल्हयातील नागरीकांनी आपले पाल्य तथा शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडुन मी पंतग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार नाही आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही असा संकल्प घेवुन पालकांनी आपला पाल्य पतंग उडवितांना कोणता मांजा वापरतो आहे याकडे लक्ष ठेवण्याचे तसेच त्यांच्याकडे नायलॉन मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमाकांवर किंवा जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधुन पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos