महत्वाच्या बातम्या

 मुलगा आपल्या माता पित्याची कशी सेवा करू शकतो याचा आदर्श प्रभू श्रीराम कडून घेण्यासारखा आहे : संघटन मंत्री अजय चौहान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न बनण्यासाठी एक आदर्श मुलगा बनण्यासाठी प्रभू श्रीरामचे विचार आचरणामध्ये आणावे. ज्यामुळे एक मुलगा आपल्या माता-पित्यांची कशी सेवा करू शकतो. याचा आदर्शवाद प्रभू श्रीराम कडून घेण्यासारखा आहे. असे, नागपुरचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटन मंत्री अजय चौहाण यांनी १० जानेवारी मंगळवारला कोरची येथील श्रीराम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन तथा अटल टिंकरिंग लॅबच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

पुढे बोलताना गुरुला केंद्रस्थानी मानून आपले जीवन व्यतीत केल्यास कार्यसिद्धी होते. गुरुचा महिमा व्यक्त करताना एक उदाहरणदाखल सीता स्वयंवर मध्ये उचललेला बाण हा गुरुचे स्मरण करून उचलला यामध्ये त्यांना सीतेला जिंकायचे नव्हते तर गुरूला दिलेला शब्द पूर्ण करायचा होता म्हणून बान उचलताना गुरुस्मरण केला व स्वयंवर जिंकला यात गुरु महिमा व्यक्त केले. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी प्रत्येक स्पर्धेत यश, अपयश, ठरलेले असते. परीक्षकांना नंबर द्यायचे असतात. ज्यांना अपयश आले त्यांनी पुन्हा नव्या जोमाने पुढच्या स्पर्धेसाठी सज्ज व्हायचे आहे. असे उद्घाटक स्थानावरून बोलत होते. श्रीराम विद्यालयाच्या स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळ्यासोबत निती आयोग भारत सरकार यांच्या आर्थिक साहाय्य निधीतून प्राप्त अटल टिकंरिगं लॅबचे उद्घाटन करण्यात आले. 

दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीराम महाविद्यालयामध्ये १०,११,१२ जानेवारी या तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये येथील विद्यार्थ्यांचे कला कौशल्य त्यांच्या उत्साह द्विगुणीत करण्यासाठी बौद्धिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा (सामान्य ज्ञान) वाद विवाद स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, एक मिनिट स्पर्धा, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण, बक्षीस वितरण व समारोपीय स्नेह कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांचे स्नेहभोजन अशा रीतीने विविध स्पर्धा आणि कार्यक्रम ठेवून विद्यार्थ्यांना कला कौशल्य दाखवण्यासाठी श्रीराम विघालायाच्यावतीने कला-क्रीडा, विज्ञान, संस्कार वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वामनराव फाये, उद्घाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे, दोषहर फाये, डॉ. शैलेंद्र बिसेन, आंनद चौबे, नागेश फाये, प्रवेक्षक नंदू गोबाडे, राहुल अंबादे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य देवराव गजभिये यांनी केले तर संचालन प्रा. वसंतराव बांगरे आभार प्रा. राजेंद्र ठाकरे यांनी मानले आहेत. 

तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्रीराम विद्यालयाचे पर्यवेक्षक एन ल.के. गोबाडे, प्राचार्य डी. एन. गजभिये, स्नेहसंमेलन प्रमुख आर. डी. ठाकरे, सांस्कृतिक विभाग एम. पी. बाविस्कर, शारीरिक शिक्षण प्रमुख डी. के. हटवार, जुनिअर कॉलेज विभाग व्ही. एम. बांगरे, जी.बी. झोडे, जे.सी.आर. रुपेश तोफा, शाळा नायक धीरज काटेंगे, विद्यार्थिनी प्रमुख नूतन कराडे, रिशिता मोहुर्ले, सांस्कृतिक प्रमुख वैशाली राऊत, श्रेया भैसारे तसेच श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथील समस्त कर्मचारी वृंद व विद्यार्थी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos