१२ जूनला जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य बालकांचे मुलभूत अधिकार आहेत. बालकाचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बालमजुरी प्रथा कायम स्वरुपी नष्ट होणे आवश्यक आहे. १४ वर्षांखालील मुलांना बालमजुरी करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुध्द जबर शिक्षेची तरतुद केली आहे. बालमजुरी ही एक अनिष्ठ प्रथा असून ती सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक समस्यांशी निगडीत असल्यामुळे या प्रथेविरुध्द विस्तृत प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने दरवर्षी १२ जून हा दिवस जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिवस म्हणून देशभर पाळला जातो.
त्याअनुषंगाने केंद्र शासनाने बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ पारित केलेला आहे. अधिनियमानुसार १४ वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय/प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच १४ वर्ष पुर्ण परंतू १८ वर्ष पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. जर मालकाने किंवा नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास, त्यांस ६ महिने ते २ वर्षापर्यंत कारावास किंवा वीस हजार रुपये ते पन्नास हजार रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षेची तरतूद आहे.
जिल्हयातील सर्व दुकाने, आस्थापना धारकांना, उद्योजकांना, बांधकाम नियोक्ते, विटभट्टी व इतर आस्थापना मालकांना बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये. बाल कामगार आढळून आल्यास या कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन कामगार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
News - Nagpur




Petrol Price




