अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई, १ लाख ७४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
अन्न व औषध प्रशासन विभागाने सतरंजीपुरा येथे  टाकलेल्या धाडीत १ लाख ७४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
सतरंजीपूरा येथील शंकर ट्रेडिंग कंपनीच्या गोदामामध्ये टाकलेल्या धाडीत रिफाईन्ड सोयाबिन तेल (खुले टीन) २२३.४ किलो किंमतीचे ७४.२०५ रूपये किंमत व रिफाईन्ड सोयाबिन तेल (खुले बॅरल) किमतीचे १५,३४५ रिफाईन्ड सोयाबिन तेल (किंग्ज) ४८.४५६ रिफाईन्ड सोयाबिन तेल, (अंबुजा गोल्ड) २७ टीन किमतीचे ३६,३०६ असा एकूण १ लाख ३१२ किमतीचा साठा जप्त केला.  जप्त करण्यात आलेल्या साठ्यातील प्रत्येक  नमुना तपासणीसाठी प्रयोगाशाळेत पाठविण्यात आला आहे. अहवाल प्राप्त होताच, अन्न व  सुरक्षा मानदे कायद्याअंतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल तसेच ही कारवाई  अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शशिकांत कोकरे, सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे , विनोद घवड, प्रफुल्ल टोपले, अनंत चौधरी यांच्या नेतृत्वात  करण्यात आली. पुढील सणा-सुदीचा विचार करताच अन्न व सुरक्षा विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त श. रा. केकरे यांनी सांगितले आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2018-10-22


Related Photos