२४ ऑक्टोबर ला आदिवासी माना जमातीचा 'अंमलबजावणी मोर्चा' धडकणार अ.ज.प्र.तपासणी समितीच्या गडचिरोली कार्यालयावर


- पत्रकार परिषदेतून विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे आणि त्या आदेशाची अंमलबजावणी होऊन माना जमातीला वैधता प्रमाणपत्र मिळावे आदी  प्रमुख मागण्या घेऊन १० हजारच्या संख्येने माना समाज २४ ऑक्टोबर रोजी ११ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकात एकत्र येऊन विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीच्या वतीने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयावर 'अंमलबजावणी  मोर्चा' धडकणार आहे ,अशी माहिती समितीचे संयोजक नारायण जांभुळे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली आहे . 
अवैध केलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, प्रस्ताव खारीज करून परत केलेले आदेश, पुनर्सचयित करण्यात यावे व प्रकरण निकाली काढून, जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे.  प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढून, त्वरित जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, माना जमातीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. आदी प्रमुख मागण्या घेऊन हा अंलबजावणी मोर्चा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयावर धडकणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने अवैध केलेले प्रस्ताव आहेत परंतु न्यायालयात दाखल केलेले नाहीत. ज्यांचे प्रस्ताव खारीज करून परत केलेले आहेत. ज्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यांनी त्यांच्या आदेशाच्या झेरोक्स प्रत व प्रलंबित असल्याचा पुरावा, समितीला सादर करण्यासाठी मोर्च्याचे ठिकाणी समाज बांधवानी घेऊन येण्याचे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे .   
यावेळी समितीचे संयोजक नारायणराव जांभुळे, बळीराम गडमडे, पुंडलिक चौधरी, तुकाराम नन्नावरे, रामराव नन्नावरे आदी उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-22


Related Photos