चार महिन्याचे मानधन रखडल्याने एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली :
माहे जून ते सप्टेंबर २०१८ या ४ महिन्याचे मानधन न मिळाल्यामुळे २२ ऑक्टोबर रोजी पासून एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी बेमुद्दत काम बंद आंदोलन पुकारले आहे . याबाबतचे निवेदन महाराष्ट्र संगणक परिचालक संघटना शाखा एटापल्ली तर्फे गट विकास अधिकऱ्यांना सादर करण्यात आले .  
आपले सेवा केंद्रांतर्गत ग्रामपंचायत मध्ये कार्यरत केंद्र चालकास मिळणार मासिक मानधन गेले ४ महिन्यापासून मिळालेला नाही. आर.टी.जि. एस. होऊन सुद्धा मानधन झाले नसल्यामुळे परिचालकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा केंद्र चालकांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. सदर जिल्हा प्रशासनाच्या कामचलावू धोरणामुळे वारंवार अन्याय/दुर्लक्ष होत असल्यामुळे २२ ऑक्टोबर रोजी पासून संगणक परिचालक संघटना तालुका एटापल्ली च्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन काण्यात येत असल्याचे निवेदनातून स्पष्ट केले आहे. 
निवेदन देतांना संघटनेचे तालुका पदाधिकारी व  ग्रामपंचायत संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-22


Related Photos