महत्वाच्या बातम्या

 युवकाचा बळी घेणाऱ्या वाघाला केले जेरबंद



- कुकडहेटी परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये येणाऱ्या कुकडहेटी परिसरात मागील दोन दिवसांपासून धुमाकूळ घालत एका १९ वर्षीय युवकाचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास कुकडोटी डोरफोडी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात वाघ अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कुकडहेटी परिसरात काही दिवसांपासून जेरबंद झालेला वाघ दिसून येत होता. दोन दिवसांत वाघाने शेळ्या व डुक्कर मारल्याच्या घटना घडल्या होत्या. तर श्रीकांत श्रीरामे या युवकाचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीत होते. त्यामुळे वाघाच्या हालचालीवर वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी नजर ठेवून होते. अतिशिघ्र दल, स्थानिक वन कर्मचारी, पीआरटी वर्कर दिवसरात्र गस्त घालत होते. वाघाच्या लोकेशनसाठी ट्रॅप कॅमेरे लावून पिंजरेसुद्धा ठेवण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी एनसीएफ येडे, डॉ. खोब्रागडे, डीएफओ कुशाग्र पाठक, वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे घटनास्थळी ठाण मांडून बसले असताना रात्री वाघ जेरबंद झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या श्रीकांत श्रीरामेच्या कुटुंबाला वनविभागाकडून ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी या वाघाने बस्तान मांडले होते, तो परिसर जंगलव्याप्त आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos