महत्वाच्या बातम्या

 आश्रमशाळांकरीता पर्यावरण शिक्षण उपक्रमाअंतर्गत मुख्याध्यापक व शिक्षकांकरीता एक दिवसीय कार्यशाळा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या वतीने आश्रमशाळांकरीता पर्यावरण शिक्षण या उपक्रमाअंतर्गत मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी एक दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली लगतच्या १० आश्रम शाळेची निवड करण्यात आली असून निवडलेल्या शाळेतील एकूण २० मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपली उपस्थीती दर्शविली. 

कार्यक्रमाच्या सुरवातीला मुख्य कार्यक्रम आधिकारी, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र आशिस घराई यांनी शालेय मुलांसाठी पर्यावरण शिक्षण उपक्रमामागची उद्दिष्टे तसेच विद्यार्थांना व पर्यावरणाला होणारा फायदा समजाऊन देण्याकरिता नियमित शिक्षणासोबतच यांसारखे पर्यावरण शिक्षण देणे अनिवार्य असल्याचे पटवून दिले. 

त्याचबरोबर स्वप्नील गिरडे, वैज्ञानिक अधिकारी व काजल खेवले, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र यांनी पर्यावरण शिक्षण उपक्रमाचे महत्व व त्याची उपयुक्तता तसेच आपल्या विद्यार्थांना पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त निसर्ग व पर्यावरण शिक्षण घेण्याची संधी कशी उपलब्ध करून देण्यात येईल याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेदरम्यान वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून पर्यावरणाचे विविध घटक व त्यांची परस्परावलंबन समजून घेण्यात आले. उपस्थित शिक्षक व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यास सहमती दर्शविली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos