महत्वाच्या बातम्या

 नागपूर विमानतळावर ८० लाखांचे सोने जप्त : कस्टम विभागाची मोठी कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : गो एअर कंपनीच्या जी८-२६०१ विमानाने मुंबईहून नागपूरला येणाऱ्या एका प्रवाशाकडून कस्टम अधिकाऱ्यांनी १,४०० ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची किंमत ८० लाख रुपये असल्याची माहिती आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी प्रवाशाला पुढील चौकशीसाठी कार्यालयात नेले आहे.

अहमद मुर्तुझ असे प्रवाशाचे नाव असून तो देशांतर्गत विमानाने प्रवास करीत होता. मंगळवार, १० रोजी सकाळी ८.२० वाजता प्रवासी नागपूर विमानतळावर उतरताच प्राप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याच्याकडून १ किलो ४०० वजनाची सुवर्ण भूकटी जप्त केली. प्रवाशाला सकाळी १०.३५ वाजता चौकशीसाठी कार्यालयात नेले.





  Print






News - Nagpur




Related Photos