कॉमर्स पदवीधारकांना उत्तम संधी : सारस्वत बँकेत क्लर्क पदावर मोठी भरती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
कॉमर्स आणि मॅनेजमेंट पदवीधारकांना बँकेत काम करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सारस्वत बँकेने नोकरीची सुवर्ण संधी आणली आहे. सारस्वत सहकारी बँकेच्या विविध राज्यांतील शाखांमध्ये ग्रेड बी (क्लेरिकल केडर) च्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. (saraswat bank recruitment 2021 apply for grade junior officer recruitment in saraswat bank vacancy)
सारस्वत बँकेतील रिक्त जागांसाठी इच्छुक उमदेवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर saraswatbank.com वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यातील विविध शहरांमधील बँकेच्या शाखांमध्ये ज्युनिअर ऑफिसर - मार्केटिंग अँड ऑपरेशन्स या पदांवर ही भरती होत आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करावयाची असून, शुक्रवार ५ मार्च २०२१ पासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. सारस्वत सहकारी बँकेच्या विविध राज्यांतील शाखांमध्ये एकूण १५० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
Railways Recruitment 2021: रेल्वे भरतीच्या जागा वाढल्या; लेखी परीक्षाही नाहीय, संधी साधा
कोणत्या शहरात किती पदे?
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये ८५, पुण्यात २५, औरंगाबाद आणि जळगावमध्ये ०६, नाशिक व नागपूरमध्ये ०४, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये १०, रत्नागिरीमध्ये ०२ पदांसाठी भरती केली जात आहे. याशिवाय गोव्यात ०४, कर्नाटकमध्ये ०४, तर गुजरातमध्ये ०६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
सारस्वत बँक ज्युनिअर ऑफिसर भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कॉमर्स किंवा मॅनेजमेंटमधून किमान ६० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुणांसह मास्टर्स डिग्री असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. फेब्रुवारी २०२१ ला किमान २१ वर्षे आणि कमाल २७ वर्षे वय असावे, असे म्हटले आहे.
सारस्वत बँकेत ज्युनिअर ऑफिसर पदावरील निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतींच्या आधारे होणार आहे. पहिल्या टप्प्यात १६० मिनिटांची ऑनलाइन टेस्ट असेल. या चाचणीत जनरल / फायनान्शिअल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग अॅबिलीटी आणि कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड आणि क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड या विषयांवर १९० प्रश्न विचारले जातील. परीक्षा २०० गुणांची असून, किमान ५० गुण मिळवणारे उमेदवार पात्र असतील. परीक्षेच्या आधारे तयार होणाऱ्या मेरीट लिस्टनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवार १९ मार्चपर्यंत ऑनलाइन अॅप्लिकेशन सबमीट करू शकतात.
  Print


News - Rojgar | Posted : 2021-03-06


Related Photos