महत्वाच्या बातम्या

 स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार


- ३० जानेवारी रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कुष्ठरोग दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन करून कुष्ठरोगा विषयी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन समन्वय समितीची सभा संपन्न झाली. 30 जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभांमध्ये जिल्हाधिका-यांच्या आवाहनपत्राचे वाचन, ग्रामप्रमुख, सरपंच यांचे भाषण, कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा घेणे, कुष्ठऱोगा विषयी संदेश देणे हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 30 जानेवारी ते 13 फेबुवारी कुष्ठरोग पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात 30 जानेवारी रोजी मॅराथॅान, तालुका स्तरावर विविध ठिकाणी रॅलीचे आयोजन, मनपा व तालुका स्तरावर आरोग्य मेळावे, तालुका व मनपा स्तरावर खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा, मनपा स्तरावर महिला मेळावे, रॅली, जिल्हा, तालुका व मनपास्तरावर प्रश्न मंजुषा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक, डॅा. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. दिपक सेलोकार, सहायक संचालक कुष्ठरोग डॅा. दीपीका साकोरे तसेच जिल्हा कुष्ठरोग समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.  





  Print






News - Nagpur




Related Photos