नागपुरात कोरोनाचा हाहाकार : २४ तासात १० जणाचा झाला मृत्यू तर ९९५ नव्या बाधितांची नोंद


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसरली असताना आता पुन्हा एकदा झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळपाठोपाठ नागपूरमध्येही परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. मागील 24 तासांत नागपूरमध्ये 995 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपूरमध्ये मागच्या तीन दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत असताना अचानक मागील 24 तासात कोरोनाच्या आकड्याने उसळी घेतली आहे. मागील चोवीस तासात 995 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
24 तासात 578 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या नागपूरमध्ये ८८४४ ऍक्टिव्ह केसेस आहे. जरीपटका, इंदोरा, कळमना स्वावलंबीनगर, खामला, गणेशपेठ, लक्ष्मीनगर, बजाज नगर, हे नागपूरचे हॉटस्पॉट बनले आहे.
जिल्हा परिषदचे शिक्षण विभागातील ११ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  त्यामुळे शिक्षण विभागाच्या दैनंदिन कामकाजावर, शालेय परीक्षाच्या नियोजन व आरटीई प्रवेश प्रकियाच्या कामावर याचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  Print


News - Nagpur | Posted : 2021-03-03


Related Photos