सावंगी मेघे येथील खुन प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ८ तासात आरोपीला अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


- या गुन्ह्यात दोन विधी संघर्षित बालकांना अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा
: सावंगी ते पालोती रोडच्या बाजूला अज्ञात आरोपीने स्त्रीची ओळख पटू नये म्हणून तिच्या कपाळावर व उजवे डोळयाच्या वर दगडाने मारून चेहरा विद्रूप करून जिवानिशी ठार केले. याबाबत पो.स्टे.सावंगी मेघे येथे  गुन्हा दाखल करून पुढील तपास वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाती घेत अवघ्या ८ तासांमध्ये मृतक महिलेची ओळख पटवून दोन अल्पवयीन आरोपीना अटक करण्यात आली. 
 गुन्हयाची हकीकत याप्रमाणे आहे की, २० ऑक्टोबर रोजी  संध्याकाळ किंवा रात्र दरम्यान सावंगी ते पालोती रोडचे बाजूला २ किमी दक्षिण येथे कोणीतरी अज्ञात ईसमाने एक अनोळखी स्त्रीला  वय अंदाजे १८  ते २० वर्ष हीची ओळख पटू नये म्हणून तिचे कपाळावर व उजवे डोळ्याच्या वर दगडाने मारून चेहरा विद्रूप करून जिवानिशी ठार केले.  शासन तर्फे फिर्यादी गजानन श्रीराम दराडे, वय ३५ वर्ष, पो.उप.नि., पो.स्टे.सावंगी मेघे ता. जि वर्धा यांचे फिर्यादीवरून पो.स्टे. सावंगी मेघे येथे अप.क्र. 1141/2018 कलम 302, 201 भादवीचा फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून नोंद करुन तपासात घेतला. गुन्हयाचा तपास स.पो.नि. दत्तात्रय धोंडीराम गूरव हे करीत आहे.
 गुन्हयाची गंभीरता पहाता  पोलीस अधिक्षक  व  अपर पोलीस अधिक्षक  यांनी सदर गुन्हयाचा दाखल वेळेपासून पाठपूरावा करून गुन्हयात आरोपी शोधाकरीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी माहिती मिळताच घटनास्थळी भेट देवून मयताची ओळख पटविण्याकरीता व आरोपी शोधाकरीता विशेष मोहीम राबवीली. मृतकाचे फोटो वरून सावंगी, गणेश नगर, समता नगर व आजूबाजूचे परीसरात शोध घेतला असता व गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळवीली असता अवघ्या काही तासातच सदर मृतक मुलीची ओळख निष्पन्न केली. 
 त्यांनतर तपासची गती आणखी वाढवून मृतकाचे संबंधातील व्यक्ती, नातलग, मित्र, आसपासचे परीसरात राहणारे लोक, परीसरातील नागरीक यांना कसोशीने व कौशल्यपूर्णरित्या विचारपूस करण्यात आली व त्यादरम्यान माहिती मिळाली की, सदर मुलीस काही लोकांनी दोन व्यक्तींसोबत पाहीलेले आहे. त्यावरून त्या दोन व्यक्तींचा शोध घेण्याकरीता मृतकाशी  संपर्कात असलेले ६ ते ७ लोकांची कसोशीने विचारपूस करण्यात आली व त्यावरून दोन  विधी संघर्शीत बालक यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले ,त्यांना समता नगर व गणेश नगर येथून ताब्यात घेतले. 
 मृतक अल्पवयीन मुलगी व एका मुलाचे प्रेमसंबंध होते. त्यात मृतकाने मुलाला लग्नाची गळ घातली. परंतू मुलाने लग्नास नकार दिला. दिनांक १९ ऑक्टोबर रोजी मृतक अल्पवयीन मुलीस दोन अल्पवयीन मुलांनी एका अॅक्सेस गाडीवर बसवून रेल्वे स्टेशन पासून घटनास्थळी समजविण्याकरीता नेले. तेथे  जावून चर्चे दरम्यान त्यांचा वाद झाला व त्या अल्पवयीन मुलांनी तिच्याशी  बळजबरी केली व तिच्याच लॅगींगने तीचा गळा आवळला. त्यांनतर गाडीतील स्क्रु ड्रायव्हरनी तिला भोसकले व घटनास्थळावरून निघून गेले. या गुन्ह्यात विधी संघर्षित बालकांना अटक करण्यात आली असून त्यांना उद्या   न्यायालया समक्ष हजर करण्यात येईल. गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. गुरव, पो.स्टे. सावंगी हे करीत आहेत. 
 सदर कारवाई  पोलीस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली,  अपर पोलीस अधिक्षक  निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.  दिनेश कुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  निलेश ब्राम्हणे, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे निर्देशांप्रमाणे पो.उप.नि. महेंद्र इंगळे, आषीश मोरखडे, रितेश शर्मा , संघसेन कांबळे, यषवंत गोल्हर, विकास अवचट व स.फौ. नामदेव किटे, उदयसींग बारवाल, अषोक साबळे, पो.हवा. सलाम कुरेशी, स्वप्नील भारद्वाज, नरेंद्र डहाके, दिवाकर परीमल, हरीदास काकड, राजेंद्र ठाकूर, परवेज खान, दिनेष कांबळे, दिपक जाधव, ना.पो.षि. वैभव कट्टोजवार, अमीत षुक्ला, सचीन खैरकार, अमर लाखे, आनंद भस्मे, प्रदिप वाघ, हितेंद्र परतेकी, रामकृश्ण इंगळे, जगदीष डफ, राजेष आश्टनकर, संजय बोगा, तुशार भूते, मनीश श्रीवास, कुणाल हिवसे यांनी केली.

   Print


News - Wardha | Posted : 2018-10-21


Related Photos