अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट : ११ नागरिकांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था : नई दिल्ली :
अफगाणिस्तानमध्ये संसदीय निवडणुकांच्या दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ६ लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.   
अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. यापूर्वी शनिवारी झालेल्या हिंसेमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे निवडणूक लांबली होती. त्यामुळे रविवारी शेकडो मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत जवळपास ३० लाख नागरिकांनी दहशतवाद्यांच्या धमकीला न घाबरता मतदान केल्याची माहिती आहे.    Print


News - World | Posted : 2018-10-21


Related Photos