कारागृहात दांडी मारल्याप्रकरणी प्रभारी अधीक्षकासह तीन जण निलंबित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / जळगाव :
वरिष्ठांची परवानगी न घेता परस्पर कारागृहात दांडी मारल्याप्रकरणी उपमहानिरीक्षकांनी कारागृहाचे प्रभारी अधीक्षक बी.डी.श्रीराव, कंपाऊंडर राजेश एखंडे व रक्षक नामदेव चव्हाण यांना शनिवारी तडकाफडकी निलंबित केले असल्याची माहिती प्राप्त आहे . 
प्राप्त माहिती नुसार , प्रभारी अधीक्षक बी. डी. श्रीराव, कंपाऊंडर राजेश एखंडे व रक्षक नामदेव चव्हाण हे दसऱ्याच्या दिवशी विना परवानगी बाहेरगावी निघून गेले होते. त्यादिवशी कारागृहात एका बंदीवानाची प्रकृती बिघडली. त्याला शासकीय रुग्णालयात हलविण्यासाठी कारागृह अधीक्षकांची परवानगी आवश्यक होती. याबाबत कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्याकडे तक्रार झाली होती. देसाई यांच्या पडताळणीत श्रीरावसह तिन्ही जण कारागृहात नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्रीराव यांच्याकडील पदभार तडकाफडकी काढून घेण्यात आला व त्यांच्या जागी नंदुरबार येथील वरिष्ठ तुरुंगाधिकारी अनिल वांदेकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता.
कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकार सुनील कुवर यांची सुद्धा चौकशी सुरु असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर चौकशी अहवालात काय निष्पन्न होते, त्यानुसार कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.  श्रीराव, एखंडे व चव्हाण या तिघांना निलंबित केल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .   Print


News - Rajy | Posted : 2018-10-21


Related Photos