महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर गणराज्यदिन परेड साठी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : अर्णव लिलाधर वाढई या छत्रपती शाहु महाराज आयुर्वेद महाविद्यालय औरंगाबाद येथे वैद्यकिय शिक्षण घेत असलेल्या, गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड हे मुळ गाव असलेल्या विद्यार्थ्यांची गणराज्य दिन संचलन (परेड) राज्यस्तरीय २०२३ करीता निवड झालेली आहे. अर्णव  गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोलीचा माजी विध्यार्थी असुन, प्राथमिक शिक्षक लिलाधर हरिजी वाढई यांचा मुलगा आहे. त्यांना सुद्धा या वर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जिल्हा वासिय तसेच आप्तस्वकियां तर्फे पिता-पुत्राचे अभिनंदन केले जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos