चालकाचे नियंत्रण सुटले अन भरधाव चारचाकी घरात घुसली : विठ्ठलवाडा बसस्थानकानजीकची घटना


- जिवितहाणी न झाल्याने मोठा अनर्थ टळला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /चामोर्शी :
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव चारचाकी घरात घुसल्याची घटना काल २६ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास  विठ्ठलवाडा बसस्थानकानजीक घडली. मात्र जिवितहाणी न झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 
गोंडपीपरी-तालुक्यातिल विठ्ठलवाडा मार्गावर वाहन क्र.यूपी ९३ बीडी ७४०२ ही चारचाकी गोंडपिपरी मार्गे गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने आष्टीकडे जात होती. अश्यातच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन भरधाव चारचाकी वाहन रस्त्यानजिकच्या एका घरात घूसली. ही घटना विठ्ठलवाडा गावाजवळ घडली. गावच्या बसस्थानकाजवळ सिंधुबाई सरवर यांचे विटा- कवलुचे कच्चे घर आहे. अश्यातच हे वाहन भरधाव वेगात होते की रोडच्या कडेला उतरून थेट घराच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीला भगदाळ पाडून चारचाकी घरात घूसली. त्यात सरवर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने सरवर कुटूंब उघड्यावर आले आहे. लागलीच या घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पाणेकर, कोवे करीत आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-02-27


Related Photos