इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ३० डॉक्टरांना डेंग्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील ३० निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यूचे निदान झाले आहे. तर दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे . 
या रुग्णालयात डेंग्यूचे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहेत. ३० खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल असून, नाईलाजाने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे.डॉक्टरांच्या मते, वसतिगृहातील ड्रनेज लाइन नेहमीच तुंबते. वसतिगृहाच्या आजूबाजूला पाणी साचते. त्यामुळे ते डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनले आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2018-10-21


Related Photos